esakal | रायगड - महाडमध्ये 32 घरांवर दरड कोसळली; 72 जण बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

महाडमध्ये 32 घरांवर दरड कोसळली; अनेकजण बेपत्ता

sakal_logo
By
सूरज यादव

रायगड - गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. महाड तालुक्यातील नाते रोडवर तळीये गावात दरड कोसळली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 32 घरावर ही दरड कोसळली असून यामध्य 72 जण बेपत्ता असल्याची माहिती समजते.

दरड कोसळून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जखमी किंवा जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या दुर्घटनेत अंदाजे 72 लोक बेपत्ता असल्याच सांगितलं जातं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

loading image