नॉन कोविड रूग्णांची मोठ्या रूग्णालयांकडे पाठ, जाणून घ्या त्या मागचं नेमकं कारण 

नॉन कोविड रूग्णांची मोठ्या रूग्णालयांकडे पाठ, जाणून घ्या त्या मागचं नेमकं कारण 

मुंबईः  मुंबईतील परिस्थिती हळूहळळू पूर्वपदावर येतेय. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचं दिसतं. पालिकेनं आपल्या रूग्णालयात जनरल ओपीडी सुरू केली असून इतर रूग्णांवर देखील उपचार करण्यास सुरूवात केली आहे. असे असले तरी पालिकेच्या केईएम, शीव आणि सायन रूग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर रूग्णांनी पाठ फिरवल्याचं दिसतं. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांसाठी असलेल्या बहुतांश खाटा रिकाम्याच आहेत. 

मुंबईत दररोज साधारणत 800 ते 1200 रूग्ण सापडत आहेत. या रूग्णांवर महापालिका तसेच खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येताहेत. पालिकेच्या रूग्णांलयात ही कोरोना रूग्णांवर अधिक लक्ष देण्यात येत असल्याने सर्वसामान्य रूग्णांकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. त्यामुळे इतर रूग्णांच्या मनात भीती बसली आहे. शिवाय प्रमुख रूग्णालयांत कोरोना रूग्णांची रेलचेल असल्याने इतर रूग्ण या रूग्णालयांत जाण्यास कचरत आहेत. 

पालिकेच्या सायन,केईएम तसेच नायर रूग्णालयांत महत्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. अत्यावश्यक शस्त्रक्रियांचे रूग्ण वगळता अपवादानेच रूग्ण पालिका रूग्णालयात येत आहेत. 6 महिने झाले तरी खासगी, छोटी- मोठी रूग्णालये अजूनही बंद असल्यानं कोरोना व्यतिरिक्त इतर रूग्णांची फरफट होत आहे. तसेच सर्वसामान्यांसह गोरगरीबांचा आधार असलेल्या केईएम, सायन, नायर रूग्णालयात ही अन्य रूग्णांवर अभावानेच उपचार केले जात आहेत. 

सायन रूग्णालयात एरव्ही बाह्यरूग्ण विभागात सुमारे साडेसहा हजार रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र सध्या 1500 रूग्ण उपचारासाठी येत आहेत. या रूग्णालयात 1450 खाटा असून त्यापैकी 300 खाटा कोरोनासाठी राखीव आहेत. केईएम रूग्णालयात 2250 खाटा असून त्यापैकी आठ विभागातील खाटा कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवल्याचे समजते. तसेच तिन विभाग परिचारीकांसाठी राखीव आहेत. सद्यस्थितीत रूग्णालयात 170 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असून लक्षणे नसलेले परंतू विविध गंभीर आजार असलेले 70 रूग्ण दाखल आहेत. 

केईएम रूग्णालयात 1200 खाटा सामान्य रूग्णांसाठी असून सध्या 400 रूग्ण दाखल झाल्याची माहिती मिळते. महापालिकेने नायर रूग्णालय हे करोन रूग्णालय म्हणून घोषीत केले आहे. 1200 खाटा असलेल्या रूग्णालयात आता 600 खाटा कोरोना तर 600 खाटा सामान्य रूग्णांसाठी आहेत. मात्र या रूग्णालयांत 40 टक्क्याहून कमी सर्वसामान्य रूग्ण उपचारासाठी येत असल्याचे समजते.

(संपादनः पूजा विचारे)

Large hospitals non covid patients Most beds general patients empty

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com