कोरोनाकाळात हळदीच्या मागणीत मोठी वाढ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर

भाग्यश्री भुवड
Thursday, 3 September 2020

कोरोना आणि पावसाळी आजारांच्या साथीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मुंबई : कोरोना आणि पावसाळी आजारांच्या साथीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निल्सन कंपनीच्या सर्व्हेनुसार, कोरोना काळात देशात हळदीची मागणी 40 टक्क्यांनी वाढली. या काळात लोकांनी हळदीचे दुध किंवा काढे पिण्यावर भर दिल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. 

कोरोना काळात दालचिनी, तूळस, काळीमिरी अशा वेगवेगळ्या काढ़्यांचे सेवन वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हळदीसह इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या मसाल्यांच्या मागणीतही 40 टक्के वाढ झाल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. पुढील सहा महिने रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही मागणी कायम राहिल, असेही सर्व्हेत सांगण्यात आले आहे. 

ऑनलाईन न्यायालयांत अडथळ्यांची शर्यत! पायाभूत सुविधांचा अभाव; वकील, पक्षकारांची गैरसोय 

याबाबत आहारतज्ज्ञ तसेच, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या प्रतीक्षा कदम सांगतात की, हळदीचे गुणधर्म जगजाहीर असल्यामुळे कोरोना काळामध्ये हळदीच्या विक्रीत वाढ झाली आहे. परंतु, हळदीमुळे कोरोना बरा होता यावर अजूनही कोणतेही संशोधन आलेले नाही. हळद काहीशी रुक्ष, पचायला हलकी, चवीला तिखटसर कडू आणि उष्ण असते. गुणाने उष्ण असल्यामुळे हळद कफ-वाताच्या विकारांमध्ये उपयोगी होते. कडू चवीमुळे ती पित्तशामकही असल्याने तिच्या सेवनाने फायदा होतो.

 

कोरोनाकाळात हळदीचे सेवन केल्यास ते नक्कीच उपयोगी होईल. परंतु, कोरोना झाल्यावर डा‌ॅक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करणे आवश्यक आहे. 
- प्रतीक्षा कदम,
आहारतज्ज्ञ

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large increase in demand for turmeric during the Corona period; Emphasis on boosting the immune system