मुंबईतील रुग्णसंख्येत मोठी वाढ;  1929 नवीन रुग्णांची भर, वाचा इतर आकडेवारी

मिलिंद तांबे
Saturday, 5 September 2020

मुंबईतील कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढायला लागला आहे. शुक्रवारी 1,929 नवीन रुग्ण सापडले असून, मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,52,024 वर पोहोचली आहे.

मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढायला लागला आहे. शुक्रवारी 1,929 नवीन रुग्ण सापडले असून, मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,52,024 वर पोहोचली आहे. मुंबईत आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 7,796 वर पोहोचला आहे; तर शुक्रवारी 1,110 रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या शहराचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे. 

क्रॉफर्ड मार्केट अपघात प्रकरण; चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणी; परवाना रद्द करण्याबाबत पोलिसांची विनंती

मुंबईत आज नोंद झालेल्या 35 मृत्यूंपैकी 28 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 25 पुरुष, तर 10 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 35 रुग्णांपैकी 25 रुग्णांचे वय 60 वर्षावरील होते, तर 10 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते. आज 1,110 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत 1,21,671 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 77 दिवसांवर गेला आहे; तर 3 सप्टेंबरपर्यंत एकूण 8,02,647 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या; तर 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान कोव्हिड रुग्णवाढीचा दर हा 0.90 इतका आहे. 

हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा; फिजिओथेरपी सुरू करणार

6,797 इमारती सील 
मुंबईत 560 इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,797 असून, गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,463 अतिजोखमीचे रुग्ण आहेत, तर 2,256 रुग्ण कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत. 
--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे् )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A large increase in the number of patients in Mumbai; 1929 Addition of new patients, read other statistics