"७ कोटी रुपये जमा करा, नाहीतर आम्ही शहीद व्हायला तयार"; लष्कर ए तोयबाचा ई-मेल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

मुंबई - मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. देशाच्या आर्थिक राजधानिवर अनेकांची वाकडी नजर कायमच असते. या आर्थिकी राजधानी मुंबईने आतांकवाद्यांचे अनेक घाव सहन केलेत आणि न थांबता मुंबई स्पिरिट दाखवून दिलंय. अशातच मुंबईवर पुन्हा एकदा मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सावट आहे. या संदर्भातील एक ई-मेल लष्कर ए तोयबकडून आलाय. मुंबईतील मीरा रोडमधील पंचतारांकित हॉटेल सेव्हन इलेव्हन उडवून देण्याची धमकी या ई-मेल मधून आली आहे. हे हॉटेल भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीचं आहे.

मोठी बातमी :  "गुलशन कुमार यांची हत्या होणार हे ठाऊक होतं" राकेश मारियांचा खळबळजनक खुलासा...

'लश्कर-ए-तोयबा'ने हॉटेलच्या ऑफिशियल ई-मेल आयडीवर मेल पाठवत 24 तासांच्या आत 7 कोटी रुपयांची मागणी केलीये. या हॉटेलसोबत मुंबईतील अन्य चार हॉटेल्सला देखील बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी आलेली आहे. यामध्ये  'द लीला' हॉटेल, 'सहारा स्टार', 'सी प्रिंसेस' आणि 'द पार्क' या चार प्रसिद्ध हॉटेल्सला समावेश आहे.  हॉटेलच्या फीडबॅक फॉर्मच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. 24 तासाच्या आत 7 कोटी रुपये जमा झाले नाहीत तर हॉटेल बॉम्ब ने उडवून देऊ आणि यासाठी आमही शाहिद व्हायला तयार आहोत असं देखील ई-मेल मध्ये नमूद केलंय.

मोठी बातमी : महाविकास आघाडीतील 'दोन' मंत्र्यांचा घेतला राजीनामा ?

याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण हॉटेल रिकामं केलंय. हॉटेलची कसून झाडाझडती घेण्यास सुरुवात केलीये. हॉटेल तूर्तास बंद करून बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी केली जातेय. श्वानपथकाला देखील याठिकाणी पाचारण करण्यात आलंय.

lashkar e taiba sends email to deposit 7 crore rupees to five star hotel owner of mira road

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lashkar e taiba sends email to deposit 7 crore rupees to five star hotel owner of mira road