"गुलशन कुमार यांची हत्या होणार हे ठाऊक होतं" राकेश मारियांचा खळबळजनक खुलासा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या 'Let Me Say It Now' या पुस्तकातून एकापेक्षा एक भयंकर गौप्यस्फोट केलेत. आधी कसाबबद्दल खुलासा केल्यानंतर आता राकेश मारिया यांनी कॅसेटकिंग गुलशन कुमार यांच्या हत्येबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे. गुलशन कुमार यांची हत्या होणार आहे याबद्दल आपल्या खबऱ्याने आपल्याला फोनवरून दिली होती असं राकेश मारिया यांनी म्हंटल आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या 'Let Me Say It Now' या पुस्तकातून एकापेक्षा एक भयंकर गौप्यस्फोट केलेत. आधी कसाबबद्दल खुलासा केल्यानंतर आता राकेश मारिया यांनी कॅसेटकिंग गुलशन कुमार यांच्या हत्येबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे. गुलशन कुमार यांची हत्या होणार आहे याबद्दल आपल्या खबऱ्याने आपल्याला फोनवरून दिली होती असं राकेश मारिया यांनी म्हंटल आहे.

मोठी बातमी - "कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

काय होता तो फोन संवाद :

  • खबऱ्या : "सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है"..
  • मारिया : "कौन गिरानेवाला है विकेट ?"
  • खबऱ्या :"अबू सालेम, उसने अपने शूटर्स के साथ सब प्लान नक्की किया है"..
  • मारिया : "कैसे?"
  • खबऱ्या : "गुलशन कुमार साहाब रोज घरसे निकलके पहले एक शिव मंदिर जाता है. वहीं पे उनका काम खतम करने वाले है"...
  • मारिया : "खबर पक्की है क्या?"
  • खबऱ्या : "साहब एकदम पक्की खबर है, नहीं तो आपको कैसे बताता?"
  • मारिया : "और कुछ खबर मिले तो बताना"..  

"हे सगळ ऐकून मी सुन्न झालो होतो आणि आता काय करावं असं विचार मक्षय मनात आला" असं राकेश मारिया यांनी लिहिलं आहे"

मोठी बातमी -  जेलमध्ये अजमल कसाबने ऐकली 'अजान' आणि....

त्यानंतर काय घडलं?..

राकेश मारिया यांच्या पुस्तकानुसार, "मी दुसऱ्या दिवशी महेश भट्ट यांना फोन केला आणि तुम्ही गुलशन कुमार यांना ओळखता का अशी विचरण केली. भट्ट त्यावेळी गुलशन कुमार यांच्या एका सिनेमावर काम करत होते. त्यांनी मला गुलशन कुमार हे रोज शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात ही माहिती दिली. गुलशन कुमार यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करा, तसंच मला त्यांच्याबाबतची माहिती पुरवत रहा असं मी तातडीने गुन्हे शाखेला कळवलं.

मोठी बातमी -  बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..

मात्र १२ ऑगस्ट १९९७ ला मला फोन आला आणि माहिती मिळाली की गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली आहे. मी विचारलं कुठे हत्या झाली? तर शंकराच्या मंदिराजवळ असं उत्तर आलं. खरं म्हणजे गुलशन कुमार यांना उत्तर प्रदेश पोलिसांची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र पोलिस बेसावध झाले आणि गुलशन कुमार यांची ऐन सकाळी हत्या झाली. मात्र मी माझ्या पद्धतीनं त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला", असं राकेश मारिया यांनी म्हंटल आहे.

दरम्यान राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकातून खुलासे करण्याची मालिका चालवली आहे. आतापर्यंत अनेक महत्वाचे गौप्यस्फोट त्यांच्या पुस्तकातून करण्यात आले आहेत.

ex mumbai police commissioner rakeh maria revealed truth about gulshan kumar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex mumbai police commissioner rakeh maria revealed truth about gulshan kumar