
वसई : नालासोपारा येथील सोपारा गावातील पेशाने डॉक्टर असणारे जोशी कुटुंबीय बाप्पांची मूर्ती घरीच तयार करून अंगणात विसर्जन करत आहेत. ही पर्यावरणपूरक परंपरा आज नव्हे तर गेल्या 204 वर्षांपासून जपली जात आहे. पिढ्यानपिढ्या आलेली ही परंपरा तरुण पिढी देखील उत्साहाने पुढे नेत आहे. त्यांच्या या उपक्रमातून ते समाजासमोर पर्यावरणाचा संदेश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या वर्षी देखील बाप्पाच्या मूर्तीला आकर्षक असा आकार देऊन त्यांच्याकडून बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आली आहे.
सोपारा गाव येथे डॉ. किशोरकुमार जोशी आणि डॉ. हेमकांत जोशी यांच्या कुटुंबांचे वास्तव्य आहे. 1816 साली घरीच गणपतीची मूर्ती तयार करण्याची संकल्पना मनात आली व पेणचे प्रसिद्ध मूर्तिकार गोखले यांच्याकडून वैद्य मोरेश्वर रघुनाथ जोशी यांचे नातू कृष्णराव जोशी यांनी मूर्ती घडविण्याचे धडे गिरवले. बाप्पांना कलेच्या माध्यमातून डोळ्यासमोर ठेवले आणि अत्यंत भक्तिभावाने मूर्ती साकारण्यात आली. मूर्ती साकारण्याचा आनंद निराळाच असल्याने यापुढे गणेशमूर्ती घरीच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजतागायत या कुटुंबाकडून शाडूची माती वापरून घरीच मूर्तीला आकार दिला जात आहे. अंगणात विसर्जन करून झाल्यावर उरणाऱ्या मातीतून पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पा साकारले जातात. जितेंद्र, केदार, राम जोशी ही कुटुंबीयातील तरुण पिढी आता भक्तिभावाने गणेशोत्सवाची जबाबदारी सांभाळत वारसा पुढे नेत आहेत. बैठ्या आसनावर ही 5 फुटांची मूर्ती तयार करण्यात आली आहे. पर्यावरणाला जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे धोका निर्माण होत असतो. त्यामुळे या संकल्पनेचे कौतुक केले जात आहे.
पूर्वजांची ही संकल्पना पुढील पिढीला भावली आहे. त्यामुळे कोणताच खंड पडलेला नसून अत्यंत उत्साहात मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम गणेशोत्सवाच्या वीस दिवसांआधी सुरू केले जाते. या वर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन नागरिकांनी गणेशमूर्ती परिसरातच विसर्जित करावी.
- डॉ. किशोरकुमार जोशी
(संपादन : वैभव गाटे)
from last 204 year joshi family make shadu mati ganesha idol in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.