तारापूर MIDC मधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; जवळची गावे हादरली

संदीप पंडित
Monday, 17 August 2020

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या 'नंडोलिया केमिकल्स' या कंपनीमध्ये सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे.

विरार ः पालघर जिल्यातील बोईसर जवळील तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर टी 141 मधील 'नंदोलिया ऑरगॅनिक केमिकल्स  प्रा. लिमिटेड' या रासायनिक कारखान्यात संध्याकाळी  साडेसातच्या  सुमारास झालेल्या भीषण स्फोटात  1 ठार, 4 जखमी व एक लापता असल्याचे समोर आले आहे. तारापूर एमआयडीसी मध्ये झालेला हा  गेल्या चारमहिन्यातील दुसरा स्फोट आहे. यापूर्वी ग्यालेक्सि झालेल्या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला होता. 

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्याच्यामुळे  बाजूला असलेली सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर व किनारपट्टीच्या जवळील गावे हादरली आहेत. या स्फोटाचा आवाज पंधरा किलोमीटर वर असलेल्या पालघर शहरात देखील ऐकायला आला आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना एमआयडीसीतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईनजीकच्या बेटांवर आता थेट गाडीने जाता येणार; महापालिकेने घेतला पुढाकार

स्फोटात  1) मोहम्मद मोहसीन अल्ताफ (वय 30 वर्ष) ,  2) दिलीप गुप्ता (वय 28 वर्ष 3), उमेश कुशवाहा (वय 22 वर्ष 4), प्रमोदकुमार मिश्रा (वय 35 वर्ष) हे चार इसम जखमी झाले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचे नाव संदीप कुशवाहा असे आहे.

सदर कारखान्यात वीस कामगार  कामावर होते  असे  बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक  प्रदीप कसबे यांनी सांगितले.
 कंपनीमध्ये डायक्लोरो बेंजामाईड एजॉल या प्रोडक्टचे काम चालू असताना मटेरियलमध्ये पाणी जास्त झाल्याने डायक्लोरो डेस्टिलेशन चालू असताना रियॅक्टरचे प्रेशर वाढून हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे.  स्फोटाचा मोठा आवाज झाला तसेच रिॲक्टरचा काही भाग शेजारच्या कंपनीत हवेतुन  उडून पडला तर आगी बरोबरच परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरले होते  

काय सांगता? भिवंडीतील पहारे गावात 25 वर्षांपासून सरपंचच नाही; कारण वाचून व्हाल थक्क!

 घटनास्थळी त्वरित पोलीस, रुग्णवाहिका आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल होऊन आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळविले. तर अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख , पालघर, तहसीलदार सुनिल शिंदे पालघर  एमपीसीबी चे अधिकारी मनीष होळकर  यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली

 

-----------------------------------------

( संपादन  - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massive explosion at a chemical company in Tarapur MIDC; Nearby villages trembled