Big News - खरंच मुंबईत आर्मी येणार का ? महापौर किशोरी पेडणेकर म्हणतायत... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

निर्बंधांचं पालन करा आणि घरातच राहा. नाहीतर नाईलाजानं आम्हाला मिलिट्रीला बोलवावं लागेल आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्याच अडचणी वाढतील", असं अल्टीमेटमच महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना दिलं आहे.

मुंबई - कोरोनाचं संकट देशात दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात नागरिक लॉकडाऊनचं काटेकोर पद्धतीनं पालन करताना दिसत नाहीये. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यात आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

मुंबईत काही लोकं लॉकडाऊनचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.  "कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं सांगितलेले आवश्यक सर्व नियम पाळा. निर्बंधांचं पालन करा आणि घरातच राहा. नाहीतर नाईलाजानं आम्हाला मिलिट्रीला बोलवावं लागेल आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्याच अडचणी वाढतील", असं अल्टीमेटमच महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना दिलं आहे.

मुंबई हायकोर्ट आलं राज्य राज्य सरकारच्या मदतीला धावून, केलं असं काही... 

मिलिट्री कोणाचंच ऐकणार नाही:

"आता तरी नागरिकांना काही प्रमाणात बाहेर जाता येतंय आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येतेय. मात्र मिलिट्री आल्यावर या सर्व सोयी सुविधा बंद होतील. मिलिट्री कुणाचंही ऐकणार नाही. म्हणूनच नागरिकांनी एकमेकांना समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने वागावं,” असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलंय.

खासगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांची लूट संतापजनक:

मुंबईत खासगी रुग्णालयांकडून कोरोनाग्रस्त रुग्णांची लूट होत आहे. यावर महापौरांनी संताप व्यक्त केला आहे. “कोरोनावर अजून कोणतंही औषध नाहीये तर खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून ६ लाख रुपये बील होत आहे. यात आपण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीपीई किट्स, मास्क वगैरे गोष्टींचा भाग समजू शकतो. मात्र, बिलाची रक्कम खूप जास्त आहे. खासगी रुग्णालयांनी ५० हजार किंवा १ लाख रुपयांचं पॅकेज करावं," असं महापौरांनी म्हंटलंय.

as a last option we will have call army in mumbai if citizens do not obey lockdown rules

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: as a last option we will have call army in mumbai if citizens do not obey lockdown rules