लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय 28 सप्टेंबर रोजी सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय 28 सप्टेंबर रोजी सुरू होणार

मुंबई - दिवंगत गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. मंगेशकर कुटूंबियांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत हे महाविद्यालय येत्या २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली. (Lata Mangeshkar college news in Marathi)

हेही वाचा: Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांच्या विरोधात पुण्यात तक्रार!

पहिल्या टप्प्यात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार असून त्यानंतर पदविका आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. तसेच या संगीत महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेली कलिना येथील जागा हस्तांतरित करून तेथे सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते.

लता मंगेशकर या 'भारतरत्‍न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न - १९९८) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला होता. लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये१९७४ ते१९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले होते.

Web Title: Lata Mangeshkar International Music College To Open On September

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..