
पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून लातूर विभागाच्या १९५ एसटी बसगाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. या गाड्या मुंबई आणि उपनगरांतील प्रवाशांना कोकणात घेऊन जाणार आहेत.