भारतीय कौशल्य संस्थेच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ; टाटा आयआयएस मुंबईकडून मिळणार शिष्यवृत्ती 

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 26 December 2020

स्किल इंडिया कार्यक्रमाला चालना देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते टाटा- इंडियन इन्स्टिट्यूट स्किल्स (आयएसएस) येथील प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचा शुभारंभ करण्यात आला.

मुंबई  : स्किल इंडिया कार्यक्रमाला चालना देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते टाटा- इंडियन इन्स्टिट्यूट स्किल्स (आयएसएस) येथील प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचा शुभारंभ करण्यात आला. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रिन्युअरशीप (एमएसडीई), भारत सरकार आणि टाटा- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. 11 नोव्हेंबर रोजी एमएसडीई आणि टाटा आयआयएस यांच्यादरम्यान ही संस्था स्थापन करण्याचा अधिकृत करार झाला होता. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टाटा-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या पहिल्या तुकडीमध्ये फॅक्‍टरी ऑटोमेशनमधील दोन कामांसाठीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा कालावधी प्रशिक्षणार्थींच्या पूर्वपात्रतेनुसार 1 ते 4 आठवड्यांचा असेल. या संस्थेच्या शुभारंभाच्या टप्प्यामध्ये संस्थेकडून आकर्षक शुल्कयोजनांच्या पर्यायांसह पहिल्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. सर्वप्रथम प्रवेश घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांसाठी 75 टक्‍के शिष्यवृत्ती योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे. या वेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक, टाटा-आयआयएसचे संचालक गिरीश कृष्णमूर्ती उपस्थित होते. 

Launch of training courses of Indian Skills Institute Scholarship from Tata IIS Mumbai

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of training courses of Indian Skills Institute Scholarship from Tata IIS Mumbai