

pawar-family-lavasa-case-court-rejects-petition
Esakal
मुंबई, ता. २२ : पुण्यातील लवासा हिल स्टेशन प्रकल्पाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशीची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २२) फेटाळली. कायदेशीर तरतूद दाखवण्यात याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे सांगून गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.