शेतकरी आणि कामगार कायद्यांविरोधात जव्हारमध्ये डाव्या पक्षांचे आंदोलन

नामदेव खिरारी
Thursday, 26 November 2020

केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध दर्शवत आज देशभर संप पुकारण्यात आला होता

जव्हार ः केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध दर्शवत आज देशभर संप पुकारण्यात आला होता. डाव्या पक्षांनी या कायद्यांना विरोध दर्शवला आहे. कायद्यांचा निषेध म्हणून जव्हार येथील आदिवासी क्रांतिवीर चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. 

हेही वाचा - रायगड जिल्ह्यात अनेक शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; शिक्षकेतरांची चाचण्या अपूर्ण

यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 1 केंद्र सरकारचे शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे व प्रस्तावित वीज विधेयक रद्द करा, प्रत्येक गरजू कुटुंबाला 7,500 रुपये मदत करा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करा, कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धत बंद करा अशा विविध मागण्या केल्या. आदिवासी क्रांतिवीर चौक येथे भारताचा कम्यूनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन, अ. भा. जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ येथे रास्ता रोको करण्यात आले. यामधे शेकडो आदिवासी तसेच इतर कार्यकर्ते सामिल झाले होते . 

 

केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. आदिवासी भागात रोजगार नाही त्यामुळे आदिवासिंना हे सरकार वाळीत टाकत आहे. त्यांचे अधिकार हिरावत आहेत. त्यामुळे भाजपा सरकार विरोधी आंदोलन यापुढे तीव्र करण्यात येईल. 
- कॉ. रतन बुधर,
राज्य कमेटी सदस्य, भारतीय कम्युनिष्ट पक्ष 

Left parties in Jawhar against farmers and labor laws

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Left parties in Jawhar against farmers and labor laws