esakal | आरे कॉलनीत बिबट्याचा महिलेवर हल्ला, दृश्य CCTV मध्ये कैद
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

आरे कॉलनीत बिबट्याचा महिलेवर हल्ला, दृश्य CCTV मध्ये कैद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : गोरेगावातील आरे कॉलनी (aarey colony goregaon) परिसरात एका ६४ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला (leopard attack on woman goregaon) केल्याची घटना घडली. बिबट्याने हल्ला करतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. महिलेने प्रसंगावधान राखत काठीने बिबट्याला हाकलून लावले. त्यामुळे तिचा जीव वाचला असला तरी तिला किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

हेही वाचा: बांद्राई धनगरवाड्यात चक्क घरात घुसला बिबट्या अन्..

आरे कॉलनीतील ६४ वर्षीय महिला सीईओ कार्यालयाबाहेर बसली होती. यावेळी बिबट्याने अचानक मागच्या बाजूने हल्ला केला. महिलेने आक्रमक पवित्रा घेताच बिबट्याने झडप घेऊन महिलेला खाली पाडले. मात्र, महिलेने पाय आणि हातातील काठीने बिबट्यावर पलटवार केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. त्यांचा आवाज ऐकून कुटुंबीय धावून आले. झटापटीमध्ये महिलेला किरकोळ जखम झाली असून त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱामध्ये कैद झाले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून आरे कॉलनी परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. हल्लेखोर बिबट्याला पळवून लावण्याची मागणी केली जात आहे. बुधवारी रात्री ही घटना घडताच वनविभागाची टीम या परिसरात दाखल झाली आहे. हल्लेखोर बिबट्याला पळवून लावण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच ही घटना गंभीर असून हल्लेखोर बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वनविभागाची टीम तयारीला लागली आहे, असे संजय गांधी नॅशनल पार्कचे आरएफओ संजय भारब्दे यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना सांगितले.

loading image
go to top