esakal | बिबट्याने केला १४ वर्षीय मुलीवर हल्ला ; महिन्यभरातील ६ वी घटना | Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या

बिबट्याने केला १४ वर्षीय मुलीवर हल्ला ; महिन्यभरातील ६ वी घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 14 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. महिन्याभरातील ही सहावी घटना असून यामुळे स्थानिक रहीवाश्यांमध्ये भीती पसरली आहे.

मुंबईतील आरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून स्थानिकांवर हल्ले वाढले असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता शुक्रवारी रात्री सुद्धा बिबट्याने एका 14 वर्षीय मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.बिबट्याच्या या हल्ल्यात दर्शन सतीश हा मुलगा जखमी झाला आहे. तो प्रसुती कॉलेजजवळील युनिट 13 येथे राहतो. शुक्रवारी रात्री सुमारे 9.13 वाजता तो त्याच्या मित्रांसोबत जंगलाच्या रस्त्याने जात होता. त्याचे मित्र पुढे गेले असता त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर दर्शन याने आरडाओरड सुरु केली असता तेथे अन्य जण ही धावत आले. बिबट्याला तेथून पळवून लावण्याचा सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर बिबट्या पळून गेला.

गेल्या आठवड्यात आरे डेअरी येथील घराबाहेर बसलेल्या एका वयस्क महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्याआधी बिबट्याच्या हल्ल्यात एक चार वर्षीय छोट बाळ देखील जखमी झालं होतं. बाबट्याच्या वाढलेल्या हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून एका मादी बिबट्याला बंदीस्त केले होते. मात्र बंदिस्त केलेला बिबट्याच हल्ला करणारा बिबट्या आहे का याबद्दल अद्याप वन विभागाने स्पष्ट केलेले नाही.

हेही वाचा: वॉर्डाचा विकास करा किंवा माझ्यावर अंत्यसंस्कार करा!

आरे परिसरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. सर्वाधिक आगी ह्या युनिट क्रमांक 13 आणि 16 मध्ये लागल्या आहेत. शेकडो एकरांचा भूभाग उजाड झाला आहे. याच परिसरात बिबट्याचे हल्ले देखील वाढले आहेत. बिबट्याचे सर्वाधिक हल्ले हे युनिट क्रमांक 16 मध्ये झाले आहेत.

हल्ले करणारा मादी बिबट्या असल्याचे उद्यानातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जंगलात दोन मादी बिबट्या बहिणी असून त्यातील एका मादी बिबट्याला वन विभागाने पिंजरा बंद केले. यातील दुसरी मादी बिबट्या हे हल्ले होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आरे परिसरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. जंगल भकास होत असून 500 एकर जंगलावर याचा परिणाम झाला आहे. अतिक्रमण देखील वाढत असून त्यामुळेच बिबट्याच्या हल्ल्यांचा सामना देखील करावा लागत आहे. प्रशासनाने यावर कडक पावलं उचलणे गरजेचे आहे.

- संजीव वाल्सन , आरे बचाव कार्यकर्ते

loading image
go to top