esakal | 'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट'; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहील बारीक नजर
sakal

बोलून बातमी शोधा

'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट'; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहील बारीक नजर

या प्रकल्पासाठी 60 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 40 लाख रुपये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभाग तर 20 लाख रुपयांचा खर्च वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया संघटनेकडून केला जाणार आहे.

'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट'; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहील बारीक नजर

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईच्या आसपास असणाऱ्या बिबट्यांचे विश्व आता उलगडणार आहे. बिबट्या कुठे राहतो, काय करतो, कुठे जातो, कसा प्रवास करतो याबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील या बिबळ्यांचा प्रवास नेमका कसा होतो ते रेडिओ कॉलरच्या माध्यमातून जाणून घेतले जाणार असल्याची माहिती  मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुना यांनी दिली.

बिबट्यांच्या दैनंदिन हालचालींचा अभ्यास करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाने 'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट' राबवला जातोय. उद्यानातील पाच बिबट्यांना 'रेडिओ कॉलर' लावण्यात येईल. त्या माध्यमातून बिबट्यांंच्या हालचाली टिपल्या जातील. यातून बिबट्या आणि मानवी संघर्ष याचा अभ्यास ही करता येईल. मुंबई अशा प्रकारे पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. जानेवारीपासून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुना यांनी दिली.

महत्त्वाची बातमी : निवृत्तीचं वय ५८ वर्षे ठेवावा ! खटुआ समितीचा अहवाल राज्याने फेटाळल्याची नोंद

मुंबईच्या आसपास वावरणाऱ्या बिबट्यांचा गेल्या तीन वर्षांपासून कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने अभ्यास सुरू आहे. याच्याच जोडीने आता रेडिओ कॉलर वापरून बिबट्यांमध्ये अधिक माहिती मिळवण्यात येणार आहे. यासंदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये एक करार ही करण्यात आला. यामुळे आता बिबटया सारख्या बुजऱ्या प्राण्याबद्दल अधिक अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे याची उकल देखील रेडिओ कॉलरमुळे होऊ शकते. परिणामी बिबट्यांंच्या व्यवस्थापनासाठीही याची पुढे मदत होऊ शकेल. 

रेडिओ कॉलरमधून मिळणारे सिग्नल उपग्रहांकडे जातात. त्याची तारीख आणि वेळ याची अचूक नोंद होते. मग ही माहिती अभ्यासकाकडे पाठवली जाते. या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष प्राणी कुठे आहे आणि काय करत आहे याचा शोध घेता येतो. यातून बिबटे जंगलात वावर नेमका कसा करतात हे समजण्यासाठी होणार आहे. या माध्यमातून उद्यानाचे व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे शक्य होईल. 

महत्त्वाची माहिती : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; वैद्यकीय शिक्षणाच्या अतिरिक्त फीचा भार सरकार उचलणार 

या प्रकल्पासाठी 60 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 40 लाख रुपये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभाग तर 20 लाख रुपयांचा खर्च वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया संघटनेकडून केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना देखील बिबट्यांच्या हालचालींचा आनंद घेता येणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

leopard collar project each and every moment of leopards fromSGNP will be captured

loading image
go to top