खरंच! खारघर डोंगरात बिबट्याचा वावर?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

ओवे डोंगरावर ठाणे आणि पनवेल वन विभागाकडून गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून वन संवर्धनाचे काम केले जात आहे. तसेच परीसरातील वृक्ष तोड थांबविण्यासाठी वन विभागाने फणसवाडी, चाफेवाडी, धमोळे आदिवासी पाड्यात वन विभागाने स्वयंपाकसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले आहे.

खारघर : खारघर डोंगरावरील झाडावर मृत अवस्थेत वासरु आढळून आले. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

महत्वाची बातमी : पालघरसह डहाणूत 'निसर्ग' वादळाचे संकट; प्रशासनासह 'एनडीआरएफ' सतर्क

ओवे डोंगरावर ठाणे आणि पनवेल वन विभागाकडून गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून वन संवर्धनाचे काम केले जात आहे. तसेच परीसरातील वृक्ष तोड थांबविण्यासाठी वन विभागाने फणसवाडी, चाफेवाडी, धमोळे आदिवासी पाड्यात वन विभागाने स्वयंपाकसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण आणि नागरिकांच्या भटकंतीचे प्रमाण खूप कमी झाल्याने हळूहळू डोंगरात मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने डोंगर हिरवेगार दिसत आहे.

#NisargaCyclone : मुंबईकरांनो राहा तयार, साधारण 'या' वेळी आणि इथं धडकणार निसर्ग चक्रीवादळ

खारघरमधून जाणारा डोंगर थेट मुंब्रा डोंगराला मिळतो. गेल्या काही वर्षांत परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे  परिसरातील शेतकऱ्यांची गुरे चाऱ्याच्या शोधात डोंगराचा आसरा घेत आहे. त्यात खारघर ओवे डोंगरात एका झाडावर गाईच्या वासरूचा मृतदेह आढळून आला. वासरूला मारून  बिबट्या झाडावर घेवून जावू शकतो. त्यामुळे खारघर डोंगरात बिबट्या तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे.

नक्की वाचा'स्प्रे सॅनिटायझर' वापरताय?...मग सावध राहा....'हा' आहे धोका!

1990 च्या काळात खारघर डोंगरात बिबटे, वाघ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत. नवी मुंबईची निर्मिती होत असताना इमारत बांधकामामुळे जेसीबी, पोकलनच्या आवाजामुळे जंगली जनावरे निदर्शनास आले नाही.
- बी. टी. पाटील,पर्यावरण प्रेमी खारघर.

खारघरमध्ये बिबट्या निदर्शनास आला नाही. झाडावर असलेल्या गाईच्या वासरूचे छायाचित्र पाहून तपास केला जाईल.
- डी. एस. सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी, पनवेल वन विभाग

Leopard roaming in Kharghar hills read full detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard roaming in Kharghar hills read full detail story