esakal | Video : 'लॉकडाऊन'मध्ये मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय बिबट्या ?
sakal

बोलून बातमी शोधा

Video : 'लॉकडाऊन'मध्ये मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय बिबट्या ?

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक बिबट्या शहरातील एका रस्त्यावर बसलेला दिसतो आहे. 

Video : 'लॉकडाऊन'मध्ये मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय बिबट्या ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सध्या कोरोनानं देशभरात हाहाकार माजवला आहे. त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय आणि कारखाने बंद आहेत. देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  याचा फटका वन्य प्राण्यांना आणि पक्ष्यांना बसतोय. अन्नाच्या शोधात हे पशुपक्षी शहरांमध्ये येत आहेत. 

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक बिबट्या शहरात रस्त्यावर बसलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मुंबईच्या शीवमध्ये एका रस्त्यावर हा बिबट्या आढळून आला असं या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा: आपल्या पाल्यांना शाळेत  पाठवायचं कसं? पालक आणि शिक्षक संभ्रमात.. 

काय आहे या व्हिडिओत: 

व्हिडिओत एक बिबट्या रस्त्याच्या कडेला बसला दिसतोय. मात्र तो कोणावरही हल्ला न करता घाबरून शांत बसला दिसतोय. त्याचवेळी रस्त्यावरून नियमितपणे वाहतूक सुरू आहे. मात्र काही हौशी लोकांनी या बिबट्याची मोबाईल शूटिंग घेऊ सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या शीवमधला आहे असं सांगण्यात येतंय. मात्र आम्ही या मागचं सत्य जाणून घेतलंय. 

या व्हिडीओ मागचं सत्य: 

इंटरनेटवर बराच वेळ शोध घेतल्यानंतर हा व्हिडीओ मुंबईच्या शीवमधला नाहीये हे आमच्या लक्षात आलंय. रस्त्यावर बिबट्या आढळलेला हा व्हिडीओ मुंबईचा नाहीये तर हा व्हिडीओ हैदराबादचा आहे अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे. हैदराबादमध्ये हा बिबट्या रस्त्यावर आढळून आला होता. त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न वन विभाग करत होता.  काही वेळानंतर या बिबट्याला सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं. त्यामुळे हा व्हिडीओ मुंबईचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

हेही वाचा: वानखेडे पाठोपाठ ब्रेबर्न स्टेडियमही ताब्यात घेण्याचा महापालिकेचा विचार... 

त्यामुळे असे व्हिडीओ पसरवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारच्या व्हिडीओचं आधी सत्य तपासूनच व्हिडीओ पुढे पाठवा.  

lepoard found on mumbais road reality behind this viral video read full story 

loading image
go to top