वानखेडे स्टेडियमपाठोपाठ ब्रेबर्न स्टेडियमही ताब्यात घेण्याचा महापालिकेचा निर्णय

वानखेडे स्टेडियमपाठोपाठ ब्रेबर्न स्टेडियमही ताब्यात घेण्याचा महापालिकेचा निर्णय

मुंबई ः कोरोना रुग्णांसाठी वानखेडे स्टेडियमपाठोपाठ ब्रेबर्न स्टेडियमही ताब्यात घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे, त्याचबरोबर मुंबईतील महत्त्वाच्या जिमखान्यातील सुविधाचा फायदा घेण्याचा विचारही मुंबई महापालिका करीत आहे. 

मुंबई महापालिकेने वांद्रे कुर्ला संकुल, एनएससीआय डोम तसेच महालक्ष्मी रेसकोर्सवर यापूर्वीच रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे. वानखेडेप्रमाणेच ब्रेबॉर्न स्टेडियमवर अतीदक्षता विभागातील तसेच ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांना ठेवण्याचा विचार करीत आहोत. मुंबईतील नामवंत स्टेडियमवर रुग्णांची व्यवस्था होत आहे हे नवीन नाही. अमेरिकन टेनिस स्पर्धा होणाऱ्या न्यूयॉर्कमधील फ्लशिंग मेडोज येथे कोरोना रुग्णांवरील उपचारास सुरुवातही झाली आहे. 

वानखेडे स्टेडियम परिसरात असलेल्या गरवारे क्लब हाऊसमध्ये 45 रुम्स आहेत, तर मुंबई क्रिकेट संघटनेच्या लाऊंजमध्ये 400 ते 500 बेडस्् राहू शकतील असा मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. आवश्यकता भासल्यास  मैदानाचही उपयोग करता येईल. ब्रेबॉर्न स्टेडियममध्येही क्लब हाऊस आहे. त्याचबरोबर ब्रेबॉर्न स्टेडियम असलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधील अन्य सुविधांचाही उपयोग करण्याबाबत विचार सुरु आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या शेजारील जागा बंदीस्त करुन तिथेही काही कक्ष उभारण्याचा विचार आहे. तोच विचार ब्रेबॉर्नबाबतही होत आहे.  

वानखेडे तसेच ब्रेबॉर्न स्टेडियमसह मुंबईतील विविध जिमखान्यांचाही विचार सुरु आहे. पोलिस जिमखाना, पारसी जिमखाना, इस्लाम जिमखाना यांचा कोवीड केअर सेंटर म्हणून उपयोग होऊ शकेल. या जिमखान्यात माफक बदल करुन तिथे क्यूबिकल्स तयार होऊ शकतील. या जिमखान्याच्या मैदानांचा सध्या तरी विचार नाही, मात्र आवश्यकता भासल्यास त्याबाबत विचार नक्की करणार असेही आधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com