कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी; डॉ. ईश्वर गिलाडा यांचे मत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी; डॉ. ईश्वर गिलाडा यांचे मत

मुंबई   :  जगभरातील काही देशांत कोरोनाची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. भारतात कोरोनाची संक्रमण क्षमता कमी दिसत असल्याने दुसरी लाट तूर्तास अशक्य दिसत असल्याचे मत एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर गिलाडा यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आरटी-पीसीआर टेस्टऐवजी प्रशासनाने अँटीबॉडी टेस्ट वाढवण्याचा सल्लाही त्यांनी ‘कोरोनाची सद्यस्थिती आणि भविष्यातील शक्यता’या वेबिनारमधून दिला आहे.

डॉ. ईश्वर गिलाडा यांनी वेबिनारमध्ये सांगितले की, राज्यभरातून अनेक एचआयव्ही संक्रमित रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत येत असतात. त्यांची अँडीबॉडी टेस्ट केल्यानंतर बहुतेक रुग्णांना कोरोनाची लागण होऊन गेल्याची माहिती समोर आली. त्याचे प्रमाणही आजघडीला 30 ते 40 टक्क्यांदरम्यान पोहोचले आहे. याठिकाणी उपचारासाठी येणार्‍या रुग्णांमध्ये 80 टक्के मुंबई, तर 20 टक्के राज्यभरातून येतात. अर्थात राज्यात चार महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण होऊन गेलेल्या नागरिकांची 10 टक्क्यांवर असलेली संख्या आजघडीला 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच अवघ्या 60 ते 70 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण होणे बाकी आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या अर्थव्यवस्थेचा थांबलेला गाडा संबंधित नागरिकांची अँटीबॉडी टेस्ट केल्यास पूर्वीप्रमाणे सुरू करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना रुग्णांसाठी जी रुग्णालये मोठ्या संख्येने राखीव केलेली आहेत, ती सर्वसामान्य रुग्णांसाठी खुली करता येतील.
सरकराने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि इतर आजाराची लागण असलेल्या रुग्णांना प्रथम कोरोना लस देण्याची गरज आहे. मात्र वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांसाठी सरकारने आरोग्य सेतूच्या धर्तीवर स्मार्ट हेल्थ कार्डसारखी व्यवस्था उभारण्याची गरज आहे. जेणेकरून शासनाला वैद्यकीय पार्श्वभूमी ओळखून खर्‍या गरजू रुग्णांपर्यंत लसीकरण पोहोचवणे सोपे जाईल, असे गिलाडा यांनी सांगितले.

रुग्णतपासणीत डॉ. गिलाडा यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
-यापूर्वी कुटुंबात एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या निकटवर्तियांना कोरोना झाल्याचे दिसत होते. 
-मास्क व हेडशिल्डचा एकत्रित वापर केल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता 99 टक्क्यांपर्यंत कमी होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल, शाळा, महाविद्यालय व इतर कार्यालये सुरू करता येतील.
-मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ धुणे अशा त्रिसूत्रीचा वापर केल्याने कोरोनाने पछाडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, या त्रिसूत्रीचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात दंड वाढवण्याची गरज आहे.
 -जगभरात एका-एका देशात कोरोनाचे लाखो रुग्ण सापडत असताना तैवान, व्हिएतनाम, कम्बोडिया आणि थायलंड या चार देशांतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आजही सुमारे 6 हजारांच्या घरात आहे. कारण प्रदूषण आणि याआधी आलेल्या विषाणूंमुळे येथील नागरिकांना मास्क वापरण्याची सवय आहे.
-भारतातील रुग्णसंख्या एकतृतीयांशावर आलेली असून मृत्युदरही अर्ध्या टक्क्याखाली आहे. म्हणूनच याठिकाणी दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे.

Less likely for a second wave of corona in maharashtra

----------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com