esakal | अडथळा दूर ! धारावी, सायनमधील विद्यार्थी 'टॅब'वर गिरवणार शिक्षणाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

TAB

शाळेला आणखी किमान 300 स्मार्टफोन किंवा टॅबची गरज आहे,  असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.

अडथळा दूर ! धारावी, सायनमधील विद्यार्थी 'टॅब'वर गिरवणार शिक्षणाचे धडे

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई :  कोरोना संकटात पहिलीपासून दहावीपर्यंत सायन येथील डीएस हायस्कूलने ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला. मात्र सायन धारावीतील काही विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी माजी विद्यार्थांनी टॅब, स्मार्ट फोनची मदत केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर धारावी, सायन, कुर्ला परिसरातल्या गरजू कुटुंबांतील 60 विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन तसंच टॅब देण्यात आले. सायन रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीकांत खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

नक्की वाचा : जुन्या कपड्यांनी उलगडला कोट्यावधींचा कर गैरव्यवहार; बोगस कोडवरून चढ्या भावाने निर्यात

राज्य सरकारने शाळा ऑनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील शाळा ऑनलाइन सुरू आहेत. मात्र राज्यातील सुमारे 60 टक्के कुटुंबांकडे आजही स्मार्टफोन नाहीत. डीएस हायस्कुल शाळेतील 35 टक्के विद्यार्थ्यांकडे डिजिटल शिक्षणासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. हे सर्व विद्यार्थी धारावी, प्रतिक्षा नगर, कुर्ला इथल्या कष्टकरी वस्त्यांमधील आहेत. पाच-सात हजारांचा स्मार्टफोन विकत घेणेही त्यांच्या पालकांना शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ऑनलाईन वर्गांपासून ते वंचित राहू नयेत, यासाठी स्मार्ट मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅबलेट् किंवा कॉम्प्युटर दान करा' असे आवाहन शाळेने केले होते.

अधिक वाचाः  चलो कोकण! मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे सोडणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या गाड्यांचा तपशील

या आवाहनाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्यात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 35 स्मार्टफोन, चार टॅब आणि दोन लॅपटॉप उपलब्ध झाले. तर, दुसऱ्या आठवड्यात सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले शाळेचे माजी रोहित मांडगे यांनी 20 नवे कोरे टॅब शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाठवले आहेत. या मदतीमुळे शाळेतील 60 विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वत:च्या हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे. शाळेला आणखी किमान 300 स्मार्टफोन किंवा टॅबची गरज आहे,  असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना करोना आर्थिक मंदीमुळे शाळेची शैक्षणिक फी भरणे शक्य होणार नाही, अशा गरजू पालकांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी डी. एस. हायस्कूलचे अमेरिकास्थित काही माजी विद्यार्थी शाळेला आर्थिक निधी उभारण्यासाठी सहकार्य करत असल्याचेही ते म्हणाले.

(संपादन : वैभव गाटे)

lessons to be learned Student on tab in Dharavi Sion