फक्त दोन दिवस वाईन शॉप्स उघडलेत आणि मिळवला 'इतक्या' कोटींचा महसूल..

फक्त दोन दिवस वाईन शॉप्स उघडलेत आणि मिळवला 'इतक्या' कोटींचा महसूल..

मुंबई - राज्यात 4 एप्रिल रोजी मद्य विक्री सुरू करण्यात आल्यानंतर मंगळवार (ता.5) पर्यंत राज्यात 16.10 लाख लिटर मद्य विक्री करून 62.55 कोटीरूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. मात्र राज्यात एकूण 36 जिल्ह्यापैकी 17 जिल्ह्यांमध्येच एकावेळी मद्यविक्री सुरू होऊ शकली आहे. तर इतर काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवार पर्यंत मद्य विक्री सुरू होण्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे. 
 
राज्य शासनाने 24 मार्च पासून राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला होता, त्यामूळे फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्रीच सुरू ठेवण्यात आली होती. तर राज्य शासन मान्य मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. दरम्यान 4 मे रोजी सिलबंद मद्य विक्री सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये राज्यातील 33 जिल्ह्यात 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर काही जिल्ह्यांमध्ये सशर्थ दुकाने सुरू करण्यात आले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. 

लाॅकडाऊन दरम्यान शेजारील राज्यातून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपायुक्त तसेच संबंधीत अधिक्षकांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान 13 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी कर्मचारी तैनात केले होते. यादरम्यान 4 मे रोजी एकाच दिवसात राज्यात 56 गुन्हे नोंदविण्यात आले असून 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 84.94 लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

24 मार्च ते 4 मे पर्यंत लाॅकडाऊन काळात एकूण 4635 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1999 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 398 वाहने जप्त करण्यात आली असून, 12.23 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. 

लॉकडाऊनमध्ये धाडसी प्रवास, तीन दिवस अनवाणी पायपीट करत तिने गाठले घर...

मद्य विक्रीसाठी दुकाने सुरू असलेले जिल्हे : 
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागीरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, बुलढाणा, नाशिक 

मद्य विक्रीसाठी दुकाने बंद असलेले जिल्हे :
सोलापूर, सातारा, औरंगाबाद जालना, बिड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर 

मद्य विक्री सुरू असलेल्या दुकांनांची संख्या :

  • तपशील - एकूण दुकाने - चालु दुकाने
  • देशी मद्य, किरकोळ मद्य विक्री दुकाने - 4159 - 1111
  • विदेशी मद्य दुकाने - 1685 - 718 
  • बियर शाॅप - 4947 - 1713
  • वाईन - 31 - 1 
  • एकूण - 10822 - 3543 

wine shops in maharashtar were open for just two days and earned crores of revenue

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com