
नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर : पुण्याच्या येरवडा जेलमधून फरार झालेला जन्मठेपेचा कैदी उल्हासनगरात ऍक्टिव्हा दुचाकीवरून मोकाट फिरत होता. मात्र गुन्हेगारी जगतातील या ‘फरार’ आरोपीचा प्रवास अखेर उल्हासनगर पोलिसांच्या सापळ्यात अडकताच थांबला. उल्हासनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाने अचूक माहितीवरून कारवाई करत या थरारक प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि आरोपीला रंगेहाथ अटक करत चोरीची दुचाकीही हस्तगत केली.