
Brain Tumor
sakal
ठाणे - ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांच्या मेंदूतील ट्युमरवर नाकावाटे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेद्वारे त्यांना नवजीवन प्राप्त झाले आहे. या अत्याधुनिक आणि कमी आक्रमक शस्त्रक्रियेमुळे रुग्णांची हरवलेली दृष्टी परत मिळाली असून, सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती हायलँड हॉस्पिटलचे वरिष्ठ न्युरोसर्जन डॉ. चंद्रनाथ तिवारी यांनी दिली.