esakal | UPA च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत ? संजय राऊतांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

UPA च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत ? संजय राऊतांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

शरद पवार यांचे देशभरातील सर्व सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत.

UPA च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत ? संजय राऊतांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : एकीकडे शेतकरी आंदोलनावरून देशभरात वातावरण कमालीचं तापलंय. अशात विरोधी पक्षांकडून सरकारला घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला जातोय. या सर्वात देशातील मातब्बर नेते शरद पवार यांचं नाव पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या गोष्टीवरून पुढे येताना पाहायला मिळतंय. सूत्रांकडून येणाऱ्या बातम्यांमध्ये UPA च्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने समोर येतंय, तशी चर्चा जोर धरतेय.  

महत्त्वाची बातमी : "त्यांची अक्कल तोकडी आहे, पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाचं महत्व काय समजणार?

शरद पवार यांचे देशभरातील सर्व सर्व राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर या गोष्टीवर शिक्कामोर्तब देखील झालाय. सोनिया गांधी यांनी UPA च्या अध्यक्षपदावर कायम राहण्यास अनिच्छा दर्शवली आहे असं समजतंय. या जागेसाठी योग्य उमेदवार लवकरच मिळेल असंही त्या म्हणाल्या असल्याचं समजतंय. त्यानंतर UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव प्रामुख्याने पुढे येताना दिसतंय.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे , कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरारच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा  ।  Marathi News From Mumbai

दरम्यान, याबाबत शिवसेना पक्षाचे राज्यसभेतील खासदार आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. संजय राऊत म्हणालेत की, शरद पवार देशातल्या प्रमुख नेत्यांसोबत राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जे शिष्टमंडळ पवारांना भेटलं त्यात पवार होते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कुणात असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. शरद पवारांना देशातील नागरिकांच्या प्रश्नांची जाण आहे. भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही टक्कर मारली आहे. महाराष्ट्रातील प्रायोग भविष्यात देशपातळीवर करता येईल का? अशी विरोधकांची इच्छा आहे. महाराष्ट्रात प्रयोग झालाय त्याच्यामुळे अनेकांना अपेक्षा देखील आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

sharad pawar chief of UPA after sonia gandhi reaction of sanjay raut

loading image