यांना आवरा रे ! तळीरामांची तहान भागवण्यासाठी फोडली जातायत Wine शॉप्स...

यांना आवरा रे ! तळीरामांची तहान भागवण्यासाठी फोडली जातायत Wine शॉप्स...

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने तळीरामांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कुर्ला आणि शिवडी परिसरांत दारूची दुकाने फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणांत गुन्हे दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवडी येथील जया देशी दारू बार चोरट्यांनी फोडला. राज्य सरकारने 20 मार्चला आदेश दिल्यापासून हा बार बंद होता. या बारच्या मालकाचे बाजूलाच सुजाता नावाचे हॉटेल आहे. तेथे राहणाऱ्या कामगाराला बारचे शटर उघडे दिसले. त्यामुळे त्याने तात्काळ दूरध्वनीवरून बारमालकाला माहिती दिली. त्यानंतर बारमालक शिवानंद शेट्टी यांनी तपासणी केली असता, देशी दारूच्या सुमारे दीडशे बाटल्या आणि गल्ल्यातील 15 हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळले. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही चोरी 29-30 मार्चदरम्यान झाली असावी, असा संशय आहे. 

कुर्ला येथील गोदाम फोडून एक लाख 15 हजार रुपयांची दारू चोरून नेल्याच्या आरोपाखाली इरफान खान (21) व वसंत नाईक (22) यांना विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीतून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना या आरोपींना अटक केली. त्यांच्या दोन साथीदारांची ओळख पटली असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 

गर्दुल्ल्यांच्या उपद्रवात घट 

रेल्वेस्थानके, निर्जन स्थळांवर गर्दुल्ल्यांकडून नागरिकांना लुटण्याच्या घटनाही कमी झाल्या आहेत. लॉकडाऊमुळे रस्त्यावर फिरणे बंद झाल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सर्व व्यवहार बंद असल्यामुळे गर्दुल्ल्यांना अंमली पदार्थ मिळणेही कठीण झाले आहे.

liquor godown break in shivadi and kurla area of mumbai during covid19 crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com