2018 च्या तुलनेत 2019 मध्ये मुंबई एक स्थान वर, गुन्हेगारीत मुंबई तिसऱ्या स्थानावर

अनिश पाटील
Wednesday, 30 September 2020

प्रति लाख लोकसंख्येमागे मुंबईत दाखल गुन्ह्यांचे प्रमाण फार कमी

मुंबई, ता 30 : देशातील 19 मोठ्या शहरांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास मुंबईत तुलनात्मक वाढ झाली आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये मुंबई एक स्थान वर म्हणजे तिस-या स्थानावर पोहोचली आहे. 2018 मध्ये दाखल गुन्ह्यांबाबत मुंबईत देशात चौथ्या क्रमांकावर होती.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) 2019 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 60 हजार 823 गुन्हे दाखल झाले होते. त्या तुलनेत दिल्लीत तीन लाख 11 हजार 092, तर चेन्नईमध्ये 71 हजार 949 गुन्हे दाखल झाले होते. 2018 मध्ये सूरत याबाबत तिस-या क्रमांकावर होते. 2019 मध्ये सूरत चौथ्या क्रमांकावर पोहोचले असून मुंबईने सूरतला मागे टाकत त्याचे स्थान मिळवले आहे.

महत्त्वाची बातमी  भाज्यांचे भाव कडाडले! कोरोनाने आधीच आर्थिक संकटात असलेल्या सर्वसमान्यांचे हाल सुरूच

दरम्यान, प्रति लाख लोकसंख्येमागे मुंबईत दाखल गुन्ह्यांचे प्रमाण फार कमी आहे. मुंबईत प्रति लाख लोख्यसंख्येमागे 330.3 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याबाबत दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीत हे प्रमाण 1906.8 आहे. त्यापाठोपाठ कोची (1711.2), जयपूर (1392.5) आणि सूरत (1179.7) यांचा क्रमांक आहे. पुणे याबाबतीत मुंबईच्या मागे आहे. पुण्यात प्रति लाख लोकसंख्येमागे गुन्ह्यांचे प्रमाण 320.4 आहे.

गंभीर गुन्ह्यांचा विचार केल्यास मुंबई देशात चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत 2019 मध्ये 170 हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. दिल्ली याबाबत प्रथम क्रमांकावर आहे. दिल्लीत 520, बंगळुरूमध्ये 210 व चेन्नईत (177) हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. हत्येच्या प्रयत्नाबाबत मुंबई देशात तिस-या क्रमांकावर आहे. मुंबईत हत्येच्या प्रयत्नाचे 343 गुन्हे दाखल झाले होते. हिसंक गुन्ह्यांबाबत मुंबईत देशात दुस-या क्रमांकावर आहे. मुंबईत 5995 हिंसक गुन्हे दाखल झाले होते. याबाबतही दिल्लीदेशात प्रथम स्थानावर आहे. दिल्लीत 11 हजार 313 हिंसक गुन्हे दाखल झाले होते.

महत्त्वाची बातमी : किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार अर्ज दाखल 

अपहरणाच्या गुन्ह्यांत मुंबई दिल्ली पाठोपाठ दुस-या क्रमांकावर आहे. दिल्लीत पाच हजार 746गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर मुंबईत असे दोन हजार 102 अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यामुळे त्याप्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामुळे हे प्रमाण देशात अधिक आहे. अपहरणाबाबत बंगळुरू(1053) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबईत खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचे सर्वाधीक म्हणजे 255 गुन्हे दाखल झाले होते. त्या पाठोपाठ  चेन्नई (213), दिल्ली (179) आणि हैद्राबाद (139) यांचा क्रमांक लागतो. शहरात दंगलीचेही सर्वधीक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 2019 मध्ये मुंबईत दंगलीचे 361 गुन्हे दाखल झाले होते. त्या पाठोपाठ पटना (225), कोझीकोडे (215), बंगळुरू (192) आणि पुणे (153) यांचा क्रमांक लागतो.

in the list of criminal activities mumbai city is on third position 2019 data released


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in the list of criminal activities mumbai city is on third position 2019 data released