

local body election date
esakal
राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.