
मुंबई : उपनगरी रेल्वेच्या तांत्रिक देखभाल व रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवार (ता. २७) रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाईल, यामुळे रविवारी विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागणार आहे.