...अखेर डॉक्टरांना ते दोन्ही शवं पुन्हा नेऊन दुसऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधी उरकून घ्यावा लागला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

नेरुळ स्मशान भूमीत कोरोनाबधितांच्या अंत्यविधीला विरोध, बाहेरून शव आणल्याने स्थानिकांचा विरोध 

नवी मुंबई : कोरोनाबधित रुग्णांपाठोपाठ आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शवांचे अंत्यविधी करण्यासही विरोध होऊ लागला आहे. नेरुळ येथील स्मशानभूमीत तुर्भे भागातील कोरोनाबधितांचे दोन शवांचे अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे अखेर महापालिकेच्या डॉक्टरांना ते दोन्ही शव पुन्हा माघारी नेऊन दुसऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधी उरकून घ्यावा लागला. 

आज संध्याकाळी तुर्भे परिसरातील दोन कोरोनाबधितांच्या मृत्यू झाल्यामुळे त्यांचे शवं नेरुळ सेक्टर 4 येथे महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र शवं स्मशानात नेण्यात आल्यावर सारसोळे गावातील स्थानिक नागरिक मनोज मेहेर यांनी जोरदार विरोध केला.

बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती ? वाचा...

महापालिकेने आणलेले शवं ज्या तुर्भे भागातील आहेत, त्याच भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तुर्भे स्मशानभूमीत व्यवस्था असताना नेरुळ स्मशानभूमीत हे शवं का आणतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बाहेरच्या परिसरातील कोरोनाबाधितांचा अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका मेहेर यांनी घेतली. त्यामुळे अखेर पालिकेच्या पथकाला आणलेले शवं पुन्हा रुग्णवाहिकेतून माघारी घेऊन जावे लागले. आम्हाला जे आमचे वरिष्ठ सांगतात त्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो असे या प्रसंगी शव घेऊन आलेल्या डॉक्टरांनी उपस्थितांना सांगितले. 

आईच्या दुधापासून तयार होऊ शकते कोरोनाच्या अँटीबॉडीज ?
 

महापालिकेने संपूर्ण शहरात नोंदनिहाय आद्ययावत स्मशानभूमी तयार केल्या आहेत. या सर्व ठिकाणी कोरोनाबधित शवांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ज्या भागातील व्यक्तीचे शव असेल त्या भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. - अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 

local people refuse to carry last rituals in nerul because demised were from turbhe area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local people refuse to carry last rituals in nerul because demised were from turbhe area