प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' प्रमुख मार्गांवर जम्बो ब्लॉक; लोकलसह मेल, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका बसणार, पण कधी? पाहा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: रेल्वे मार्गांवरील कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकलसह मेल, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका बसणार असून प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Mumbai Local Train Megablock

Mumbai Local Train Megablock

ESakal

Updated on

मुंबई : रेल्वे मार्गांवरील देखभाल, दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी (ता. १५) मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीच्या सुमारास जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे काही उपनगरी लोकल सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक पाहून नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com