Mumbai Crime : लोकलमधील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; आरोपी १२ तासांत ताब्यात

गोरेगाव-सीएसएमटी हार्बर लोकलमध्ये महिलेवर हल्ला.
accused mohammad rizwan ansari

accused mohammad rizwan ansari

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - लोकलमध्ये महिलेवर मारहाण करणाऱ्या आरोपीला अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. गोरेगाव ते सीएसएमटी जाणाऱ्या हार्बर लोकलमध्ये ५ ऑगस्टला झालेल्या या घटनेचा व्हिडीओ ६ ऑगस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीसह पीडित महिलेचा शोध घेतला. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com