

Local Train Illegal Advertisement Controversy
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबई लोकलमधील बेकायदेशीर जाहिरातींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी बाबा बंगालीच्या जाहिराती लोकल डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झळकल्या होत्या. त्या प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असतानाच, आता थेट भोजपुरी चित्रपटांसाठी कलाकारांच्या ऑडिशनच्या जाहिराती लोकल ट्रेनमध्ये लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.