esakal | मध्य रेल्वेवर स्टंटबाज पुन्हा सक्रिय; कडक कारवाईसाठी पोलिसांनी कंबर कसली
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेवर स्टंटबाज पुन्हा सक्रिय; कडक कारवाईसाठी पोलिसांनी कंबर कसली

मध्य रेल्वेवर गेले काही महिने गायब झालेले स्टंटबाज पुन्हा सक्रिय झाले आहेत. या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होत आहे. 

मध्य रेल्वेवर स्टंटबाज पुन्हा सक्रिय; कडक कारवाईसाठी पोलिसांनी कंबर कसली

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई  : टाळेबंदीनंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद आहे; मात्र दुसरीकडे मध्य रेल्वेवर गेले काही महिने गायब झालेले स्टंटबाज पुन्हा सक्रिय झाले आहेत. या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होत आहे. 

रविवारी (ता. 7) शीव-दादरदरम्यान सकाळी 9.30 च्या सुमारास एक तरुण धावत्या लोकलमध्ये स्टंट करत असल्याचा प्रकार घडला. त्यानंतर स्टंटबाजांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या सुरक्षा बळाकडून स्टंटबाजाचा शोध सुरू आहे. कोरोनाकाळात लोकल सेवा बंद होती. जूनमध्ये अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाली. 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली. त्यामुळे आता स्टंटबाजांचा सुळसुळात सुरू आहे. स्टंटबाज लोकल प्रवासात थरथराक स्टंटबाजीचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करतात; मात्र यामुळे स्वतःच्या आणि इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. आता रेल्वे पोलिस स्टंटबाजांवर कडक कारवाई करणार आहे. 

मुंबई, रायगड, पालघर, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

टाळेबंदीच्या आधी मार्च 2019 पासून ते फेब्रुवारी 2020 पर्यंत रेल्वे पोलिसांकडून या स्टंटबाजांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. ज्यात 500 पेक्षा जास्त स्टंटबाजांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक लाख 96 हजार 50 रुपये दंडही आकारला होता. 

स्टंटबाजी करणाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ कोणत्या रेल्वेस्थानकादरम्यानचा आहे. कोणत्या वेळेची लोकल होती. त्या लोकलच्या नंबरचा शोध घेतला जात आहे. यासह रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्हीची पाहणी रेल्वे सुरक्षा बल, पोलिसांकडून करण्यात येत आहे. अशा स्टंटबाजांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

local train marathi update The stuntmen Central Railway reactivated mumbai train latest update