

Mumbai Local Train Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार, ११ जानेवारी २०२६ला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान, तर ठाणे ते वाशी/नेरूळ या ट्रान्स हार्बर मार्गावर दाेन्ही दिशांकडील धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.