

Mumbai Local Megablock on Mahashivratri
ESakal
मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर रविवारी (ता. १५) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वे च्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान तसेच पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर ते बोरिवली स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात गर्डर लॉन्चिंगच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.