
Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर विविध देखभाल-दुरुस्तीकरिता रविवारी (ता. २१) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. २०) नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.