

Mumbai Local Megablock
Esakal
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा- मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे- वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे.