Mumbai Local Train : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा; वांद्रे स्थानकात सिग्नल बिघाड

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड
Local train stoppage on Western Railway line Signal failure at Bandra station mumbai
Local train stoppage on Western Railway line Signal failure at Bandra station mumbaiSakal

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप-डाउन धीम्या मार्गावरील लोकल वाहतुक विस्कळित झाली. या बिघाडामुळे शेकडो प्रवासी लोकलमध्ये अडकून पडले आहे. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमार घडली आहे. त्यामुळे कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

शनिवारी रात्री ८.५४ वाजताच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकात दरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे पश्चिम रेल्वे मार्गवरील लोकलचे तीनतेरा वाजले. यामुळे वांद्रे ते खार रेल्वे स्थानकादंरम्यान डाउन मार्गावरील लोकल गाड्या सिग्नल बिघाडामुळे जागीच खोळंबल्या आहे. परिणामी लोकलच्या रांगा लागल्या.

त्यामुळे शेकडो लोकल प्रवासी लोकल गाड्या अडकून पडले होते. लोकलच्या खोळंबामुळे रात्री प्रवाशांना लोकलमधुन उतरून रेल्वे रुळावरून मार्ग काढून जाण्याची वेळ आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहचून रात्री ९.४४ वाजता बिघाड दुरुस्त करण्यात आलेला आहेत. या बिघाडामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com