Theft in Local : लोकलचं वेळापत्रक कोलमडलं, चोरट्यांनी टायमिंग साधलं; हार्बरवर एकाच दिवशी २६ मोबाईल चोरीच्या घटना

लोकल तसेच मेल, एक्स्प्रेस गाड्यांना वाढलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरांकडून मोबाइल लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Mumbai Local
mumbai localsakal

लोकल तसेच मेल, एक्स्प्रेस गाड्यांना वाढलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरांकडून मोबाइल लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत मुंबई विभागात दोन्ही रेल्वे मार्गावर शंभराहून अधिक मोबाइल चोरीला गेल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

यापैकी केवळ १३ मोबाईल चोरीचा माग काढण्यात रेल्वे पोलिसांना यश मिळाले आहेत. विशेष म्हणजे २९ एप्रिलला हार्बर मार्गावर लोकल ट्रेन घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. याचा फायदा चोरट्यांनीही घेतला. २९ एप्रिलला हार्बर मार्गावर २६ मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत.

रेल्वे प्रवासात किंवा रेल्वे स्थानकांवर मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचा तपास करताना मुंबई लोहमार्ग पोलिसही निरनिराळ्या युक्त्या अवलंबत आहेत. यात काही प्रमाणात मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश येत आहे, मात्र तरीसुद्धा मोबाईल चोरीच्या घटना कमी होत नाही आहेत.

गेल्या चार दिवसांत रेल्वेचा गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी मोबाइलवर हात मारल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. गेल्या आठवड्यात हार्बर लाईनसेवा विस्कळित झाली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदाही मोबाईल चोरट्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मोबाईल आणि पाकीट चोरीचे गुन्हे हे सर्व साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे ऐन गर्दीच्या वेळीच घडतात. त्यामुळे रेल्वे पोलिस या वेळेत सतर्क राहतात. मुंबईत दररोज ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. आमच्याकडे एवढ्या मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांनीही दरवाजात उभे राहून मोबाइलवर बोलणे टाळावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

हार्बर विस्कळित झाल्याचा फायदा

हार्बर मार्गावर २९ एप्रिल आणि १ मे रोजी लोकल रुळावरून घसरली होती. या मार्गावरची वाहतूक विस्कळित झाल्यामुळे प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. या दोन्ही दिवशी मोबाईल चोरी, पाकीटमारी तसेच मंगळसूत्र चोरी करण्याच्या घटना जास्त नोंदवण्यात आल्या आहेत.

१ मे रोजी जवळपास ३१ मोबाईल चोरी गेल्याचे गुन्हे दाखल झाले आहे. तसेच २९ एप्रिल रोजी २६ मोबाईल चोरीचे गुन्हे नोंदवले गेले आहे. याशिवाय नोंद न झालेल्या चोरींची संख्या यापेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com