

Local trains convert into AC Local
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गांवरील सर्व साध्या लोकल गाड्या टप्प्याटप्प्याने वातानुकूलित (एसी) करण्यात येणार असून, या वातानुकूलित लोकलचे भाडे, वेळापत्रक आणि सेवा विस्ताराचा आराखडा आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून निश्चित केला जाणार आहे. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) आयआयटी मुंबईची नियुक्ती केली आहे.