Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Panvel-Karjat Railway Corridor : पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रक्लपाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून सह्याद्रीच्या डोंगररांगांतून रेल्वे बोगदे उभारण्यात आले आहेत.
Panvel-Karjat Railway Corridor

Panvel-Karjat Railway Corridor

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला थेट उपनगरी रेल्वेची जोड देणाऱ्या पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे; मात्र संपूर्ण प्रकल्पात सर्वाधिक लक्ष वेधणारा आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांतून उभारण्यात आलेले तीन रेल्वे बोगदे. डोंगराळ आणि खडकाळ भाग भेदत उभारण्यात आलेल्या या बोगद्यांमुळे उपनगरी रेल्वे मार्ग उभारण्याचे मोठे अभियांत्रिकी आव्हान यशस्वीरीत्या पेलले गेले आहे. हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com