
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाची भर घालणाऱ्या पनवेल कॉर्ड लाईन प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने अखेर मंजुरी दिली आहे. पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान सुमारे ७.५४ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून, यासाठी अंदाजे ४४४.६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी मध्य रेल्वे करणार आहे.