
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील पलावा पूल उद्घाटन सोहळा गाजत असतानाच येथील ग्रामस्थांनी एक वेगळी मागणी केली आहे. पुलाच्या उद्घाटनाआधी पुलाला पलावा रेल्वे उड्डाण पुला ऐवजी काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल असे नामकरण ग्रामस्थांनी केले आहे. पलावा चौक, पलावा रेल्वे उड्डाण पुलासाठी निळजे, काटई भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने भूसंपादित केल्या आहेत. शहरांच्या ऐवजी गावांच्या नावाने या पुलांचा उल्लेख व्हावा अशी आग्रही मागणी स्थानिक भूमीपुत्रांची असून या मागणीसाठी आम्ही हा पुढाकार घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.