बाळाच्या दुधासाठी बापाची उसनवारी

बाळाच्या दुधासाठी बापाची उसनवारी
बाळाच्या दुधासाठी बापाची उसनवारी

मुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेक सामान्य कुटुंबाची अवस्था दयनीय होत आहे. एकीकडे कोरोनापासून स्वतःचा, कुटुंबाचा बचाव करायचा; तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने बिकट परिस्थितीचा सामना करायचा.

पनवेलच्या खांदा कॉलनीत भाड्याच्या घरात राहणारे गायकवाड कुटुंब सध्या अशाच कठिण परिस्थितीतून जात आहे. विलास आणि उषा यांना एक पावणेतीन वर्षाचा मुलगा आहे. विलास गायकवाड हे पुर्वी भाजीविक्रीचा व्यवसाय करायचे. नोटबंदीच्या फटक्यामुळे त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागला.  गेल्या चार वर्षांपासून छोटी-मोठी कामे करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. बॅंकेत आजवर कमावून ठेवलेल्या अडीच लाखांमधून ते घराचे सहा हजार रुपयांचे भाडे, किराणा कसेबसे भरायचे. आता लाॅकडाऊनमुळे त्यांना लहान-सहान कामांसाठी बाहेरही पडता येत नाही. 

नुकतेच गायकवाड यांच्या मुलाला दुध हवे होते; मात्र खिशात व बॅंकेत रुपया शिल्लक नसल्याने दुधासाठी उसनवारी मागण्याची वेळ त्यांच्यावर आली. हे ह्रदय पिळवटून टाकणारे दिवस हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या वाट्याला सध्या येत आहेत. लाॅकडाऊनचे दिवस आणखी काय काय दाखवतील माहित नाही, असे हताश उद्गार गायकवाड यांनी काढले. 

छोटी छोटी कामे करून घर चालवतो. लॉकडाऊनमुळे कुठेच फिरता आले नाही. पैशांची चणचण होतीच. त्यात पावणेतीन वर्षाचा मुलगा आहे. त्याला दूध हवे होते. पैसेच नसल्याने कुणी उधारीही देणार नव्हत. काही किरकोळ सामानही आणायचे होते. त्यासाठी पाचशे रुपये उसने घेतले. सध्या सर्वांचीच परिस्थिती बिकट असल्याने जास्त उसनवारीही करता येत नाही. 
- विलास गायकवाड 

 
कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वांचेच सध्या हाल होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार चांगले प्रयत्न करत आहे.  अन्न पुरवठा प्रशासनाकडे विनंती आहे की, अशा बिकट काळात लहान मुलं असणाऱ्या गोरगरीबांना सरकारने दुधाचा मोफत पुरवठा करावा. या कुटुंबांकडे सध्या दुधासाठीदेखील पैसे नाहीत.
- विलास रुपवते, अध्यक्ष, दुर्बल घटक आघाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com