कल्याण-डोंबिवलीत 'या' तारखेपासून लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक सेवांनाच मुभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी संचारबंदी जाहीर करावी; अशी मागणी केली होती.

कल्याण : वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी रात्री उशिरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 2 जुलैला सकाळी सात ते 12 जुलैला सकाळी सात वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी संचारबंदी जाहीर करावी; अशी मागणी केली होती. गेल्या आठ दिवसांपासून पालिका क्षेत्रात दररोज 300 ते 400 कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी संचारबंदीची घोषणा करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  

हेही वाचा : वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सुविधा पुरविणारे दुकानदार, व्यापाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. 50 जणांच्या उपस्थितीत विवाह कार्य करण्याची परवानगी देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Lockdown announced in Kalyan-Dombivali, only essential services will continue


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown announced in Kalyan-Dombivali, only essential services will continue