लॉकडाऊनमुळे महामुंबईच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना खीळ; मजूर नसल्याने पूर्ण क्षमतेने काम करण्यास अडचणी

तुषार सोनवणे
Wednesday, 2 September 2020

मुंबई शहर आणि उपनगरातील विकासकामांना कोरोनाचा जबर फटका बसलेला दिसून येत आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विकासकामांना कोरोनाचा जबर फटका बसलेला दिसून येत आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे. या मोठ्या प्रकल्पांच्या विकासासाठी 50 टक्केच मजूर कार्यकत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या दिवसात ही कमी भरून न निघाल्यास प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा अवधी वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

एमएमआरडीए परिसरात सध्या मुंबई मेट्रो, रस्त्यांची कामे, उड्डाणपुल, सागरी सेतू , अन्य पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी ही कामे थांबवण्यात आली होती. तरी सर्व यंत्रणांनी आपल्या मजूरांचे वेतन, राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली होती. लॉकडाऊनच्या अखेरच्या टप्प्यांपर्यंत जवळपास 80 टक्के मजूर आपल्या मूळ गावी निघून गेले. मे महिण्याच्या अखेरिस फक्त 20 टक्के मजूर या पायाभूत सुविधांची कामे करीत होते. मजूराचंच्या कमतरतेमुळे कामे रखडली होती. त्यामुळे यंत्रणांनी नवीन कामगारांची जुळवाजुळव सुरू केली. तरीदेखील जुलैपर्यंत ती 35 टक्के इतकीच होती. सध्या ऑगस्टमध्ये या मजूरांची टक्केवारी 50 इतकी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांचे काम पूर्ण क्षमतेने अजूनही करणे शक्य होत नाहीये.

अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उगडकीस; 'एनसीबी'ची एकाला अटक

मजूराच्या अभावामुळे ठरलेल्या वेळेत प्रकल्पांची कामे होतील का याबबात शंकाच आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मते या कामांना निच्छितवेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकण्याची शक्तता आहे.  तरी देखील मेट्रो2ए आणि मेट्रो7 या प्रकल्पांचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करणार आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown disrupts projects with importance in Mumbai; Difficulties working at full capacity due to lack of labor