esakal | नवरात्रोत्सवात खरेदीकडे ग्राहकांची पाठ; बाजारपेठेवर मंदीचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदी.

कोरोनासंकट हळूहळू सावरत आहे. शासन निर्णयानंतर दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू झाले आहेत. नवरात्रोत्सव व येणारा दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारीवर्गाकडून सर्व प्रकारची दुकाने मालाने भरली आहेत. बाजारात गर्दीही होत आहे. खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. 

नवरात्रोत्सवात खरेदीकडे ग्राहकांची पाठ; बाजारपेठेवर मंदीचे सावट

sakal_logo
By
अनिल पाटील

खोपोली ः कोरोनासंकट हळूहळू सावरत आहे. शासन निर्णयानंतर दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू झाले आहेत. नवरात्रोत्सव व येणारा दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापारीवर्गाकडून सर्व प्रकारची दुकाने मालाने भरली आहेत. बाजारात गर्दीही होत आहे. खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. 
कोरोनासंकटामुळे अर्थव्यवस्था अनेक अर्थाने अडचणीत आली आहे. खोपोली शहराचे संपूर्ण मार्केट पूर्णपणे येथील औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे; मात्र औद्योगिक क्षेत्रात कमालीची आर्थिक मंदीची स्थिती आहे.

गुजरातमध्ये गरब्याला परवानगी नाही, मग राज्यात कशाला? सुनिल तटकरेंचा भाजपला टोला

मोठ्या प्रमाणावर कामगार-कर्मचारी कपात सुरू आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. सुरू असलेल्या अनेक कंपन्याही दोन ते तीन महिने पगार थकवून सुरू आहेत; तर काही कंपन्या दर महिन्याला पगार देत असल्या, तरी पगाराच्या तारखेबाबत अनियमिता आहे. दुसरीकडे नागरिक अद्यापही कोरोना संकट व त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीतून सावरले नसल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत अत्यंत आवश्‍यक साहित्य घेण्याकडेच नागरिकांची प्राथमिकता आहे. यात किराणा, दैनंदिन भाजीपाला, फळे व आवश्‍यक कपडेलत्तेच खरेदी केले जात आहेत. 

नवी मुंबईत बाजारभावापेक्षा दहा लाख रुपयांनी स्वस्त घरे; सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचे प्रतिपादन


इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदीचे दागिने किंवा महागडे फर्निचर, महागडे कपडे, दुचाकी-चारचाकी वाहने खरेदीसाठी अद्यापही ही सामान्य माणूस हिंमत करीत नसल्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दुकानांतील उलाढाल अद्यापही मंदावलेल्या स्थितीत आहे. दरम्यान, दसरा सणाच्या व त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर किमती वस्तू, वाहने खरेदीकडे आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी वेगवेगळ्या सवलती सुरू केल्या आहेत. तसेच सरळ व सोप्या पद्धतीने आकर्षक व्याज दरावर कर्ज उपलब्ध करण्याची सुविधा ही उपलब्ध आहेत. आगामी काळात याचा लाभ घेण्यासाठी, तरी ग्राहक वाढतील व या क्षेत्रातील व्यवहारात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यापारी वर्गात आहे. 


सहा महिने पूर्ण ठप्प पडलेली खरेदी हळूहळू वाढत आहे; मात्र अद्यापही मंदीचे सावट कायम आहे. ग्राहक वाढविण्यासाठी शून्य डाऊन पेमेंड, सोपे व कमी व्याजावरील कर्ज विविध बॅंकेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आगामी दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुधारणा होईल व खरेदी वाढेल, अशी अपेक्षा आहे. 
- महेश राठी, इलेक्‍ट्रॉनिक व फर्निचरचे व्यापारी 
lockdown effecet consumers turn their backs Shopping

(संपादन ः रोशन मोरे)

loading image
go to top