पर्यटन बंदीचा श्रीवर्धनला चार कोटींचा फटका! व्यवसायिक पर्यटकांच्या प्रतीक्षेत 

श्रीवर्धन
श्रीवर्धन

श्रीवर्धन ः राज्य सरकारने कोरोनामुळे लादण्यात आलेले निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय सुरु होणार असल्याचे आशादायी चित्र आहे. मात्र कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेल्या पर्यटन व्यवसायामुळे व्यवसायिकांना तब्बल चार कोटींचा तोट झाला आहे. 

श्रीवर्धनमधील मुख्य व्यवसाय पर्यटन म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथील मुख्य आर्थिक स्त्रोत पर्यटनच आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांची संख्या देखील अधिक आहे. दरवर्षी श्रीवर्धन शहरात साठ हजाराहून जास्त पर्यटक येत असतात. पर्यटक ज्या खासगी वाहनांमधून शहरात येतात. त्याची नोंद श्रीवर्धन नगरपालिकेकडे आहे. या गाडी चालकांकडून पर्यावरण निमंत्रण व स्वच्छता फी म्हणून दर वर्षी पालिका 4 लाख 88 हजार रुपये नगरपालिका वसूल करते. मात्र यंदा हा महसुल बुडाल्याचे चित्र आहे. 

श्रीवर्धन शहरात घरगुती पर्यटन व्यवसायिक हॉटेल मोठ्या प्रमाणात चालतात. मार्च पासून कोरोनामुळे ऐन हंगामात पर्यटन व्यवसाय बंद झाल्यामुळे याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या उद्योग धंद्यांना बसला आहे. त्याचबरोबर श्रीवर्धन मधील मासे विक्रेते, किराणा छोटे मोठे दुकानदार, रिक्षा चालक, वाहतूक व्यवस्था यांच्यावर देखील याचा फटका बसला आहे. त्यानंतर जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात येथे मोठे नुकसान झाले होते. आता पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू होणार असल्याने मंदीच्या फेऱ्यात अडकलेला येथील व्यवसायिक बाहेर पडेल. स्थानिकांना रोजगार मिळेल.असा आशावाद व्यक्त करण्यात येतो आहे. 

देशावर आलेला कोरोना सावट, त्यानंतर श्रीवर्धनला आलेल्या चक्रीवादळाचा फटका बसला. यातून आता श्रीवर्धनकर सावरले आहेत. आता छोटे मोठे उद्योग धंदे सुरु होत आहेत. पर्यटन सुरू झाल्याने देखील मोठा आधार मिळणार आहे. 
जितेंद्र सातनाक, नगराध्यक्ष, श्रीवर्धन, नगरपालिका  

 

Lockdown loss Shrivardhan's tourism business by Rs 4 crore 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com